स्वपक्षावर केलेल्या टीकेमुळे सिन्नर शहर अध्यक्षाची राष्ट्र्वादीने हकालपट्टी

सोशल मीडियावर स्वपक्षाची बदनामी होईल, असा मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नर शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांच्यावर कारवाही करत थेट पक्षातूनच हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी सोमवारी त्यांच्या हकालपट्टीचे आदेश काढले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नर शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले कोतवाल यांनी सोशल मीडियावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाबाबत खोटी विधाने केली. नामदेव कोतवाल यांच्याकडे काही वर्षांपासून सिन्नर शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती. पक्षाने ज्या उद्देशाने त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविली होती, तो उद्देश साध्य होऊ न शकल्याने पक्षातील वरिष्ठ त्यांच्या कामगिरीबाबत नाराज होते.

दरम्यान, शिस्तभंग केला म्हणून आपल्यावर कारवाई केली असेल तर मग अजित पवार यांच्यावर त्यांनी पक्ष फोडला तरी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल नामदेव कोतवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांना विचारला आहे. यावर पुन्हा एकदा कोतवाल यांनी दिड दिवसाच्या सरकारची आठवण करून देत झालेली कारवाहीवर विरोध दर्शवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here