Skip to content Skip to footer

पुन्हा एकदा पुण्यात गव्याचे झाले नागरिकांना दर्शन, वन विभागाचे अधिकारी दाखल

पुन्हा एकदा पुणेकरांना गव्याचे दर्शन झाले आहे. पुणे-बंगलोर महामार्गावर बावधन येथे हा गवा नजरेस पडला आहे. डोंगर आणि जंगल भाग तेथून जवळ असल्यामुळे तेथे हा गवा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आहे.

दरम्यान गेल्यावेळी गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि बघ्यांची गर्दी टाळण्याचे मोठे आवाहन वनविभागासमोर आहे. ९ डिसेंबर रोजी थेट एक गवा पुण्याच्या कोथरूड येथील रस्त्यावर फिरताना आढळून आला होता. मात्र वन विभाग अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे आणि नागरिकांच्या अती उत्साहामुळें गव्याला आपला जीव गमवावा लागला होता.

दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्‍यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं. गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं. मात्र यात सर्व घडामोडीत गव्याने अखेरचा श्वास घेतला.

Leave a comment

0.0/5