सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता “सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन” म्हणून होणार साजरा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी प्रसार मद्यमांना दिली आहे. आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच लवकरच अद्यादेश काढण्यात येणार आहे.

शिक्षणाची बीजे सर्व तळागाळापर्यंत रोवणाऱ्या आणि महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मीसावित्री, महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here