मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही आल्यावर त्यावर बोलेन – एकनाथ खडसे

एकनाथ-खडसे-सह-30-आमदार-महावि-Eknath-Khadse-cum-30-MLA-Mahavi

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात प्रसार मद्यमांनी खडसे यांना विचारले असता मला अद्याप नोटीस मिळलेली नाही असे खडसे यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी’ने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी चर्चेला उधाण आले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here