आघाडीच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नाही, जयदूचा भाजपाला इशारा

भाजपाने एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपने जयदूला मोठा झटका दिला आहे.

या पक्ष प्रवेशाबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी यावर थेट प्रसार माध्यमांसमोरच प्रतिक्रिया देत भाजपाला चांगले गखडेबोल सुनावले आहेत. घडलेला प्रकार आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं त्यागी यांनी बोलून दाखविले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला, याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. आघाडीच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नाहीत. असं केसी त्यागी यांनी म्हटलं आहे. पाटणा येथील पत्रकारपरिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी लव-जिहादवर सुद्धा जयदूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. लव्ह जिहादच्या नावाखील देशात द्वेष व फूट पाडण्याचे वातावरण निर्माण होत आहे. घटना आणि सीआरपीसीच्या तरतुदींमुळे दोन प्रौढांना एखाद्याच्या धर्माचा किंवा जातीचा विचार न करता त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते असे त्यागी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here