Skip to content Skip to footer

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर खासगी बसचा मोठा अपघात

अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम

रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर खासगी लक्झरी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर तर सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे.

खासगी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात बसचा चालक व अन्य एक प्रवासी गंभीर जखमी आहे. इतर सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. IRB यत्रंणा, देवदूत टीम, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने तात्काळ वाहतुक सुरळीत केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

Leave a comment

0.0/5