Skip to content Skip to footer

मुंबईत २६ जानेवारी पूर्वी शाळा सुरु होण्याचे संकेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून राज्यात संपूर्ण शाळा बंद ठेवण्यात आलाय आहेत.पण अनलॉक प्रक्रियेत बहुतांश शाळा टप्याटप्याने सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २६ जानेवारी पासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. अशी माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळत आहे.

शाळा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाने आयुक्तांकडे सादर केला आहे. ज्यावर मंगळवारी निर्णय होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून कमी होणारी रुग्णसंख्या आणि नव्यानं सापडणाऱ्या रुग्णांचं लक्षणीयरित्या कमी होण्याचं प्रमाण पाहता यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो.

मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चा आणि बंद असणाऱ्या शाळा यावर आता तोडगा निघणार आहे. असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांचे या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. असे असले तरीही अंतिम निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.

Leave a comment

0.0/5