राणेंना भाजपमध्येच किंमत नाही तर इतर कोण देणार – एकनाथ गायकवाड

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीला शिवसेनेने आपल्या जुन्या मित्र पक्षाबरोबर युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून सरकार स्थापन केले होते. राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर सतत टीका सुरूच ठेवली होती. त्यात लवकरच सरकार पडेल असे भाकीतही केले होते.

दरम्यान, हे सरकार मार्चनंतर दिसणार नाही असे भाकीत भाजप नेते नारायण राणे यांनी मध्यंतरी केले होते. हे सरकार तात्पुरते आहेत. लवकरात लवकर ते मोठ्या रजेवर जाणार आहेत. तर, मार्चनंतर हे सरकार दिसणार नाही. आम्ही केंद्रातही आहोत आणि राज्यातही येणार, असं ते म्हणाले आहेत.

राणे यांच्या या टीकेवर आता माजी खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? हे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य? त्यांचा पक्ष त्यांना किंमत देत नाही तर इतर काय देणार? सरकार आलं नाही म्हणून तडफड सुरू आहे, असा घणाघात टीका गायकवाड यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here