शासकीय चर्मकाला महाविद्यालय, वांद्रे येथील प्रलंबित समस्या लागणार लवकरच मार्गी – मयूर कांबळे

शासकीय चर्मकाला महाविद्यालय, वांद्रे येथील प्रलंबित समस्या लागणार लवकरच मार्गी…

यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्या राज्याचे अल्पसंख्याक, औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्यासमोर पाठपुराव्यासह मांडल्या. याबद्दल नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

यावेळी महाविद्यालयाच्या प्रलंबित समस्या तात्काळ मार्गी लावून विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नवाब मलिक यांनी दिले. महाविद्यालयाच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना होणार त्रास लवकरात लवकर दूर करून सगळे सोयीस्कर व्हावे या हेतूने आपण काम करत असल्याचे मयूर कांबळे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री नवाब मलिक, चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे, कौशल्य विकास व उद्योजकता आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, निकम सर, सहसंचालक ए.एम. जाधव, चर्मतज्ञ अधीक्षक विलास चौधरी व इतर संबंधीत अधिकारी देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here