Skip to content Skip to footer

सहकार्याने मराठा आरक्षणसंदर्भात न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे – मुख्यमंत्री

सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टिम म्हणून प्रयत्न केले जातील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मराठा नेत्यांसोबत बैठक झाली. २५ जानेवारीला कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. त्यासाठी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीत चर्चा सकारात्मक झाली, असे शिंदेंनी सांगितले.

Leave a comment

0.0/5