Skip to content Skip to footer

तीन पक्ष मिळून संभाजीनगर नामांतर विषयावर तोडगा काढतील – गुलाबराव पाटील

राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर विषयावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यात या नामांतराला काँग्रेसने विरोध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर आता शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती आजची घोषणा नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी औरंगाबाद नाव कधीच घेतले नाही तर संभाजीनगर आले आहे. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचे नाही. संभाजीनगरच्या नावावरुन राज्यात चर्चा होत आहे. तरी या विषयावर तीन पक्ष तोडगा काढणार आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, हिंदूत्व कोणाच बदललं आणि कोणाचा बदललं नाही हे कोणाच्या सांगण्यावरुन सिद्ध होत नाही. शिवसेनेचा जन्मच हिंदूत्वापासून झालेला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5