Skip to content Skip to footer

भंडाऱ्यातील घटनेने संपूर्ण देश हळहळला, मुख्यमत्र्यांचे चौकशीचे आदेश

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे संबंध देश हळहळला आहे.

अख्खा महाराष्ट्र गाढ निद्रेत असताना भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बॉर्न युनिटमध्ये शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संबंध महाराष्ट्र हळहळला आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशीही बोलले असून त्यांना तपासाचे निर्देश दिले आहेत.

Leave a comment

0.0/5