Skip to content Skip to footer

माझी सुरक्षा कमी करा, शरद पवारांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. तसेच फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आले होते, फडणवीस यांच्या सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर , प्रसाद लाड यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. या घटनेनंतर विरोधकांनी जोरदार टीका ठाकरे सरकारवर केली होती.

आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी सुद्धा आपली सुरक्षा कमी करण्यसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आहे. याबाबत शरद पवार अनिल देशमुखांना पत्र लिहून मागणी करणार आहेत. गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच एखाद्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे? यावर सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवाला नुसार अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणीही विरोधी पक्षाचा आहे, म्हणून सुरक्षा कमी करण्यात आली नाही. समितीच्या अहवालनुसार थेट परसेप्शन किती यावर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Leave a comment

0.0/5