Skip to content Skip to footer

नव्या कृषी कायद्याला दिलेल्या स्थगितीवर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे भाष्य

नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे एक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक बैठकी पार पडल्या. परंतु, या बैठकींमध्ये शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.

या आंदोलनावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयावर शंका उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.

कोर्टानं कायद्याचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे. ते अदानी आणि अंबानींनी सोयीस्कर होईल असा अहवालच देतील. तो कायद्याच्या स्वरुपात तुमच्या बोकांडी बसवतो. तसेच कदाचित सर्वोच्च न्यायालयाला म्हणायचे असेल असे भाष्य शेट्टी यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5