मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे-वर्सोवा आणि वर्सोवा-विरार सागरी सेतू महत्त्वाचे – उद्धव ठाकरे

नवी-मुंबईतील-विकास-प्रकल-Navi-Mumbai-Development-Project

वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन प्रकल्पांचा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुखकर आणि जलद गतीने प्रवास होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे असून त्यांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वांद्रे वर्सोवा हा सी लिंक हा ९.६ किमी असून या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा सागरी महामार्ग सन २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

वर्सोवा-विरार या ४२.७५ किमी लांबीच्या सागरी मार्गाच्या पूर्व सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार आहे. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here