सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

गायिका रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही रेणू शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी मुंडेंवर केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती.

या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच आहे. पण जी आरोप करत आहे ती कुठेतरी त्यांची नातेवाईक आहे. करुणा शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केले आहे, दोन मुलेसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील. चौकशीत सगळं समोर येईल आणि त्याची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील.

तसेच एखाद्या महिलेसोबत त्यांचे लग्न आधी झालेले आहे, त्यांची मुलं आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. कोर्टाकडून काही तरी आदेश आणला. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here