Skip to content Skip to footer

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अजित पवार संतापले

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र नितेश आणि निलेश राणे आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात बलात्कार प्रकरणी अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडेंवरही माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले होते.

आता राणे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार आज पुण्याच्या सर्किट हाऊस येथे आले असताना त्यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.

Leave a comment

0.0/5