भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू,- खासदार नुसरत जहाँ

पश्चिम बंगालमध्ये येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि ग्लॅमर्स खासदार म्हणून ओळख असलेल्या नुसरत जहाँ यांनी वक्तव्य करत भाजपा हा कोरोनापेक्षा अधिका घातक विषाणू असल्याचे म्हटले आहे. भाजपा ही हिंदू आणि मुस्लीम यांदा दंगा घडवून आणतं आहे. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, असेही त्या म्हणाल्या.

नुसरत जहाँ या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीम बहुल भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कोरोना विषाणूशी केली. “तुम्ही सर्व डोळे उघडून ठेवा. भाजपासारखा धोकादायक विषाणू फिरत आहे. हा पक्ष धर्मांमध्ये भेदबाव आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये भांडणं लावतो. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील,” असे नुसरत जहाँ म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here