Skip to content Skip to footer

लवकरच ‘संभाजीनगर’वर शिक्कामोर्तब होईल -सुभाष देसाई

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी २५ वर्षांपूर्वी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे केलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच औरंगजेब सेक्युलर होता का? असा प्रश्न नामांतराला विरोध करणाऱ्यांना विचारला होता. त्यामुळे लवकरच महाविकास आघाडी सरकार संभाजीनगर या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा दावा मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत वाद आहेत असे चित्र मागच्या काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. पण पालकमंत्री सुभाष देसाईंनी यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले की, लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणेल. तसेच प्रस्ताव आणून महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर तीनही पक्षांचे जेष्ठ नेते यावर जे निर्णय घेतील तो सर्व मान्य असल्याचे जाहीर केले होते.

Leave a comment

0.0/5