Skip to content Skip to footer

एकनाथ खडसेंचा धमाका, मुक्ताईनगरात भाजपचा धुव्वाधार पराभव

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या सर्व निकालात शिवसेना पक्षाने बाजी मारली आहे. अदयाप संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी दुपार उजाडेल असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालात कधीकाळी भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या जळगावातील मुक्तीनगरमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींपैकी ९ गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.

Leave a comment

0.0/5