भाजपाचे १५ आमदार बंडाच्या पावित्र्यात, येडियुरप्पांची डोकेदुखी वाढणार

पुन्हा एकदा येडियुरप्पांची डोकेदुखी वाढणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे येडियुरप्पा यांना पक्षातील आमदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता १५ आमदार येडियुरप्पा सरकारविरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज झालेले आमदार एकमेकांच्या संपर्कात असून, भाजपाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे एका प्रसिद्ध वृत्तसमुहाने प्रसिद्ध केले आहे.

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा १३ जानेवारी रोजी विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारावेळी ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र या विस्तारावेळी भाजपच्या आमदारांनी नाराजीचा सूर आवळला होता. जे लोक सातत्याने सत्तेत आहेत, त्यांनाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री करण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, त्या चुकीच्या आहेत.

सरकारविरोधात बंडखोरीच्या पावित्र्यात असलेले भाजपाचे १५ आमदार दिल्लीला जाण्याची योजना आखत असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारनं वरिष्ठ मंत्र्यांना आणि विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळातून बाहेर करावे आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. हे नवीन चेहरे पुढील दशकभर पक्षाची बांधणी करण्याचे काम करू शकतात.

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना भाजपाचे आमदार शिवानगौडा नायक म्हणाले,”जे मंत्री २० महिन्यांपासून मंत्रिमंडळात आहेत, त्यांना आता बाजूला कराव आणि नवीन चेहऱ्यांना घेण्यात यावे. वरिष्ठ मंत्र्यांनीही पक्षासाठी काम करायला हवे आणि २०२३च्या निवडणुकीसाठी रणनिती तयार करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here