Skip to content Skip to footer

बेळगाव महानगर पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक बेळगावकडे रवाना

कोल्हापूर-बेळगाव सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना करुन शिवसैनिक बेळगावकडे रवाना झाले आहे.

बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक वेदिका संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला कर्नाटकी सरकारने नाकारले होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे तमाम शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत.

आम्ही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भगवा फडकवणारच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिनोळी या गावातून भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी बेळगावकडे रवाना झाले आहे. मात्र शिवसैनिकांना कर्नाटक पोलीस परवानगी देणार का?, असा मोठा प्रश्न आहे. कारण मागील काही आंदोलने, मोर्चे पाहता मराठी भाषिकांना तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात कर्नाटक पोलिस दडपशाही करत आले आहे असा आरोप लावण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरीही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप लावण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5