भाजप राम आणि सीतेला वेगळं करत आहे, शिवसेना नेत्या प्रियांका चुतर्वेदी यांची टीका

उत्तरप्रदेशातील अयोध्येतील राम मंदिर निर्माणच्या कार्याला आता वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातून राम मंदिरासाठी जमा करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी या मोहिमेसाठी पहिली वर्गणी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच राम मंदिराच्या उभारणीला सुरवात होणार आहे.

उत्तर प्रदेशातील आयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून राम मंदिरांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेमध्ये पहिली वर्गणी देत मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लवकरच राम मंदिर निर्माण सुरू होणार आहे.

दरम्यान, भाजपच्या प्रदेश कार्यालयात मध्ये श्री रामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची यावेळी उपस्थिती होती. यावर भाजप कार्यालयात श्री रामांची मूर्ती स्थापन करण्यात आल्या नंतर शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे.

‘भगवान श्रीराम माता सीते शिवाय अपूर्ण नाहीत का? जर माता सीतेच हरण झालं नसतं तर रावणाचा वध झाला असता का? सत्याच्या लढाईत माता सीतेच काहीच योगदान नाही का? दुःख होतं या पुरुषप्रधान संस्कृतीच्या विचारांच्या भाजप राम आणि सीता यांना वेगळं करत आहेत. हाच प्रयत्न रावणाने पण केला होता.’ अशी टीका प्रियंका यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here