Skip to content Skip to footer

राजस्थानात आयकर विभागाची मोठी धाड, तळघरात सापडले घबाड

राजस्थान आयकर विभागाने मोठी कारवाई करून धाड टाकून मोठे घबाड पकडले आहे. आयकर विभागाने जयपूरमध्ये सराफा व्यापारी, दोन रियल इस्टेट डेव्हल्परच्या कार्यालय आणि घरी धाडी मारून पावणे दोन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. एका सराफा व्यापाऱ्याच्या घरात तर तळघर सापडले असून त्यात ७०० कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आयकर विभागानं टाकेलल्या छाप्यांची कारवाई सलग ५ दिवस सुरु होती. आयकर विभागानं सराफ व्यावसायिकाच्या कार्यालयांवर आणि घरी छापे टाकले. या छाप्यांमध्ये सराफ व्यावसायिकाकडे तळघर मिळाले. यामध्ये ७०० कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे.

आयकर विभागाच्या या कारवाईत ५० टीम सहभागी झाल्या होत्या. एका टीममध्ये ४ सदस्य असे एकूण २०० कर्मचारी कार्यरत होते. ५ दिवस चाललेल्या कारवाईत हजारो कागदपत्रं आणि दस्त तपासण्यात आले. आयकर विभागाच्या माहितीनुसार हे छापे जयपूरमधील तीन मोठ्या समुहांवर टाकण्यात आले. सिल्वर आर्टग्रुप, चोराडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये १७०० ते १७५० कोटी रुपयांच्या काळा पैशाच्या कमाईचा भांडाफोड झाला आहे.

Leave a comment

0.0/5