शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे रिमोटद्वारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते अनावरण आज त्यांच्या ९५ व्या जयंती निमित्त झाले आहे.

सदर कार्यक्रम बृहमुंबई महानगर पालिकातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष, राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मंत्री मंडळातील नेते मंडळी उपस्थित होते.

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here