प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करणार – उदय सामंत

गाव-तिथे-ग्रंथालय-मंत्री-Village-there-Library-Minister

शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात कुलगुरू, कुलसचिव यांना सूचना दिल्या आहेत, असे उच्च व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

”उच्च व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय कोल्हापुरात” या अंतर्गत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपक्रमाची कोल्हापुरातून सुरुवात झाली. विभागांतर्गत ३ हजार ६३५ पैक २ हजार ७६४ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने १७ पैकी १० जणांना नियुक्ती पत्र देण्याचे सामंत यांनी जाहीर केले.

सीमाभागात शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दहा एकर जागा देण्याचे मान्य केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही घेता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे तीन केंद्र सुरू केले जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू केंद्राअंतर्गत मराठी भाषा संवर्धनासाठी येत्या काळामध्ये नियोजन केले जाणार आहे असे ही सामंत यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here