पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उदघाटन

कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या प्रतीक्षेत असलेला पत्री पुलाचा उद्घाटन सोहळा अखेर पार पडला. कल्याणमध्ये मेठ्या उत्साहात या पुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उद्घाटव सोहळ्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदारही उपस्थित होते.

आपण असे काम करावे, की जनतेने नाव काढले पाहिजे. जनतेची कोणतीच तक्रार नको. तुम्ही सुचवलेले नाव देखील ठीक आहे. आपली युती होती ज्यावेळी आपण काम केले ते जनेतेसाठी आता देखील आम्ही जनतेसाठी कामे करणार. रेल्वे, MMRDA यांनी जे काम केले ते खरोखर चांगले काम केले आहे. मिठागरचे काम आहे. आणखी काही कामे आहेत असे या उदघाट संभारंभावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हणून दाखिवले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशी आणखी कामे बाकी आहे. शीळ फाटा येथील काम लवकारात लवकर होईल अशी अपेक्षा आहे. मागील सरकार हे बोलची कडी आणि बोलाचा भात असे नव्हे. मला जनतेची तक्रार नको. जनतेच्या गर्दीमध्ये कॅमेरा फिरवा. मास्क कोणी कोणी घातले ते दाखवा. मी आज परवानगी दिली आहे. मास्क लावून ठेवा. आपण थोपवू शकलो ही नाही आणि संपवू शकलो नाही. कोव्हिड गेला नाही असे उदगार खडत मास्क वापरण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here