भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मोठा आर्थिक घोटाळा

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर हा पहिला मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एफडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल पाच ठेकेदार कंपनीच्या मालकांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मात्र या पाच ठेकेदार कंपनीकडून बँकेने दिलेली एफडीआरच बोगस असल्याचे आढळून आले आहे. ही सरळ सरळ महापालिकेची फसवणूक आहे. पाच ठेकेदार कंपनीच्या मालकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मिळालेल्या कामाच्या विशिष्ट टक्के ती रक्कम असते. अशी कोट्यवधी रुपयांची कामे कंत्राटदारांना मिळत असतात. साहजिकच कंत्राटदारांना लाखो रुपयांची अनामत रक्कम भरायला लागते. मात्र १८ ठेकेदारांनी महापालिकेला बँकेची बोगस एफडीआर दिलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here