स्थगिती सरकार म्हणणाऱ्या भाजपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चोख प्रतिउत्तर

गुरुवारी मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी सकाळी मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याच्या मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला. तर त्याच संध्याकाळी मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ही मेट्रो चालकरहीत स्वयंचलित पद्धतीने धावणाऱ्या आहेत.

या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना तत्कालीन फडणवीस सरकारच तोंड भरून कौतुक केले. तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिली म्हणून स्थगिती सरकार अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती, या टीकेला देखील मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मधल्या काळात थोडीफार टीका झाली. हे सरकार विकास कामांना स्थगिती देत आहे, अशी टीका झाली. स्थगिती कुठेही दिलेली नाही. जर स्थगिती दिली असती तर कामच झाली नसती. पण एकेक कामं पुढे जात आहेत. मध्ये मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बघून आलो. मे महिन्यापासून तो महामार्ग सुरु होतोय. नागपूर ते शिर्डी अशा टप्प्यात तो सुरु होणार आहे. एकेक मोठी कामं पुढे जात आहेत’ असं स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here