मुंबई महानगर पालिकेच्या सर्व शाळांचे नाव बदलण्यात येणार

Mumbai-Municipal Corporation-Employees-

शाळासंदर्भात बृहमुंबई महानगर पालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. आज सादर करण्यात आलेल्या मुंबई मनपाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आज महानगर पालिकेच्या शाळांचे नामांतर करण्याचा निर्णय आज महानगर पालिकेने घेतला आहे. इथून पुढे पालिकेच्या शाळा या “मुंबई पब्लिक स्कूल” नावाने ओळखल्या जाणार आहेत.

देशाच्या बजेटनंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं २०२१ आणि २०२२ चे वार्षिक बजेट जाहीर करण्यात आले. या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी २९४५ कोटींची तरतूद करण्यात आली. यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करताना महापालिकेच्या शाळांच्या नामांतराची घोषणा करण्यात आली. आता पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here