मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर

नामांतर-करायचंच-असेल-तर-आ-If the name is to be changed, then come

येणाऱ्या काही दिवसांत कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक आणि संभाजीनगर मनपाच्या निवडणुका पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.

संभाजीनगरच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एमआयडीसीने तयार केलेल्या रस्त्यांची पाहणी करणार आहेत. सुभेदारी विश्रामगृहाजवळील दीड एकर जागेवर अॅम्पी थीएटरचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे करतील. तेथे पोलीस आणि आर्मीतील बँड पथक आठवड्यातून एकदा परेड घेतील ही परेड सामान्यांसाठी उपलब्ध असेल.

तसेच किल्ले अंतर्गत तटबंदीचे संरक्षण, शासकीय महाविद्यालय प्रवेश सुशोभीकरणासह सुभेदारी विश्रामगृहातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण या कामांचा यात समावेश आहे. दोन कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी होणार आहे या सर्व कामाची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे संभाजीनगर दौऱ्यात करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here