अण्णा हजारे यांची कोंडी, केंद्राला केलेल्या या मागण्या फार काळ लटकणार

अण्णा हजारे यांनी केंद्राच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यात अण्णा हजारे यांची समजूत काढण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना यश आले होते. उच्चाधिकार समिती नियुक्तीचे आश्वासन देऊन अण्णांनी आपले उपोषण मागे घेतले होते.

मात्र, ही उच्चाधिकार समिती प्रत्यक्षात यायला अद्याप बराच काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक तर या समितीसाठी हजारे यांच्याकडून अशासकीय व्यक्तींची नावे सूचविण्यात आलेली नाहीत, तर दुसरीकडे केंद्र सरकारची संबंधित यंत्रणा दिल्लीतील आंदोलनासंबंधीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनावर झटपट तोडगा निघाला असला तरी त्यांच्या मागण्या मात्र प्रत्यक्ष मार्गी लागण्यास मोठा काळ लागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

कृषिमूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव ठरविणे अशा प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन पुकारले होते. प्रत्यक्षात २९ जानेवारीलाच यशस्वी तोडगा निघल्याने ते स्थगित करण्यात आले.

तसेच समितीच्या नियुक्तीची अधिसूचना काढावी लागणार आहे. त्यासाठी हजारे यांच्याकडून दोन-तीन नावांची प्रतीक्षा आहे. ती अद्याप सूचविण्यात आलेली नाहीत. या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्वासू व्यक्तींचा हजारे यांच्याकडून शोध सुरू आहे. शिवाय दिल्लीतील आंदोलनाचे काय होते, ते पाहून पावले टाकू, असेही हजारे यांना त्यांचे समर्थक सुचवित आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here