शिवसेनेचा विलेपार्ल्यात भाजपा व मनसेला डबल धक्का !

विलेपार्ल्यात शिवसेनेने भाजपाला आणि मनसेला डबल धक्का दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि २०१९ च्या विलेपार्लेतील विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोठया प्रमाणात शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झाली होती. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भाजपा आणि मनसेला सेनेकडून आणखीन जोरदार धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृष्णा हेगडे हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये होते. पण तिथे ते अस्वस्थ असल्याचं बोलले जात होते. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केला. कृष्णा हेगडे हे मुळचे काँग्रेसचे होते. त्यांनी मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूकही जिंकली होती. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here