वचन दिल नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागला, खासदार सावंत यांनी लगावला शहा यांना टोला

राजनाथ सिंह यांच्या उत्तराला खा-Eat Rajnath Singh's answer

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोलेबाजी करत जहरी टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री खोटं बोलतायात मी मुख्यमंत्री पदाचे वचन दिल्याचे ते खोटं बोलत आहेत. असा दावा अमित शहा यांनी रविवारी केला होता. आता त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिले आहे.

शिवसेनेला कोणतंही वचन दिले नव्हते. असे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागला. यातच कळतंय पाणी किती मुरलंय, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला. आज माध्यमांशी मुंबई येथे बोलताना त्यांनीं ही प्रतिक्रिया दिली होती.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, ठाकरे कुटुंब नेहमीच खरं बोलतं. त्यावेळेस जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात ५०-५०चा फॉर्म्युला ठरला होता. अमित शहांनीच हा फॉर्म्युला घोषित केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच झालेली ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, असं अरविंद सावंत यांनी सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here