Skip to content Skip to footer

विखे पाटील तुम्हाला राळेगणसिद्धीत बसायला खुर्ची पण नव्हती, देशमुखांनी लगावला टोला

भाजपाकडून वीजबिल वाढीबाबत राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन कार्यकर्त्यांनी केले होते. यावेळी भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही असा टोला त्यांनी लगावला होता. आता विखे पाटलांच्या या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘विखे पाटील जी, सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असा खोचक टोला देशमुख यांनी लगावला होता.

प्रकरण असे की, शेतकरी आंदोलनाविरोधात अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांची समजूत काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्रीआयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खुर्चीवर बसले होते तर विखे पाटील त्यांच्या मागे उभे असलेले दिसून आले होते या फोटोची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती. यावरूनच देशमुख यांनी विखेपाटलांना टोला लगावला होता.

Leave a comment

0.0/5