मुंबईतील भाजपच्या या बड्या नेत्याला शिवसेनेने दिला जोरदार धक्का

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे आणि हेमेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता. त्यापाठोपाठ सेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे.

भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कदम दाम्पत्याचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष मुंबईत आपला महापौर बसवण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आउटगोईंग सुरु झाली आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here