Skip to content Skip to footer

लोकलचे वेळापत्रक बदलण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लोकलचे वेळापत्रक बदलण्यात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. मंत्रीमंडळ बैठकीतही आम्ही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच लोकलच्या वेळा बदलण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे.

सध्या सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाला बंदी आहे.या वेळापत्रक संदर्भात सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्यांचा हा लोकल प्रवास सुरु झाल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसत नाही. या पार्श्वभुमीवर प्रवास खुला करण्याचा पुढचा टप्पा लवकरच जाहीर होणार आहे अशी त्यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5