‘सातारा शहरात एकाच वेळी सहा शिवशाही बसला आग.’

सातारा एसटी डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डेपोमध्ये उभ्या असलेल्या एकूण सहा शिवशाही बसला आग लागली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले आहे.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचे मोठं नुकसान झाले आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसडेपोच्या बाजूला मोठी इमारत आहे. याशिवाय जवळच मॉलदेखील आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here