“खासदारांचे १२ कोटी मोदींनी परस्पर कापले.” सुप्रिया सुळेंचा अर्थमंत्री सीतारामन यांना टोला.

हा-तर-मतदारांनी-आमच्याव-This-then-voters-ours

खासदारांचे १२ कोटी मोदी सरकारने परस्पर कापल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना टोला लगावत आपले बंधू आणि अर्थमंत्री अजितदादांकडून अर्थखातं शिकण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.

“मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची आहे. केंद्रीय आणि महाराष्ट्र कॅबिनेटच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. आता लोक आम्हाला विचारतात, एमपीलॅड फंड द्या, ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्ष तर काहीच करता येणार नाही.” असा टोला त्यांनी संसदेत लगावला होता.

याच्या अगदी उलट, एकाही आमदाराकडून… चारही पक्षांच्या बरं का, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक आमदाराला, अगदी विरोधीपक्षातीलही आमदारालाही दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतील, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्चित केलं. हा भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यातील फरक आहे. दोन कोटीही दिले आणि नंतर तीन कोटीही दिले. कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. जीएसटी येत नसतानाही राज्य सरकारकडून चांगली व्यवस्था केली जात आहे.” याकडे केंद्राचे लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here