Skip to content Skip to footer

“विधानसभा अध्यक्ष पदाबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार निर्णय घेतील.” – एकनाथ शिंदे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तसेच पक्ष नेतृत्वांनी त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक केली होती. या पूर्वी यापदावर मंत्री बाळासाहेब थोरात हे विराजमान होते. त्यामुळे यापदावर आघाडी मधून कोणाला संधी मिळणार या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

यावर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ते आज नगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. “विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील.” असेही शिंदे म्हणाले. तर “राज्यपाल यांना विमान नाकारण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य ते स्पष्टीकरण देण्यात आले आहे.” असेही त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5