लहान माझी बाहुली मोठी तिची सावली’ पंकजा मुंडेंनी दिल्या आपल्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रिंतम मुंडे यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्थरातून शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. तसेच प्रीतम मुंडे यांच्या या खास दिनी त्यांची बहीण आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अत्यंत भावुक होऊन आपल्या लहान बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. ”लहान माझी बाहुली मोठी तिची सावली…इतकी एकरूप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा.” असा शब्दात त्यांनी आपल्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा १७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीवर यावेळी वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच कार्यकर्त्यांना सुद्धा तिथूनच शुभेच्छा देण्याचे आवाहन त्यांनी केले होते

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here