Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काळजी केंद्र उभारणार – किशोरी पेडणेकर

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात दररोज वाढत असलेली रुग्णसंख्या त्यामुळे मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यात महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे पाऊल उचललं आहे. तसेच १ मार्चपासून सर्व नगरसेवकांना सुद्धा लास देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
मागील काही दिवस महापौर पेडणेकर या रस्त्यावर उतरुन मास्क न लावणाऱ्या मुंबईकरांना झापत होत्या. फेरीवाले, विक्रेते यासह सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांनी मास्क लावण्यास बजावले होते. आता मुंबई महापालिकेचे मार्शल्स लोकल रेल्वेतही फिरत आहेत.

तसेच मास्क न लावणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. याबाबत महापौर म्हणाल्या, “रेल्वेत फिरणाऱ्या मार्शल यांना मुंबई महापालिकेकडून पास दिला जाणार आहे. लग्न आणि समारंभावर लक्ष केंद्रित करणार आहे. आता लक्षणविरहित पॉझिटिव्ह रुग्णाला शिक्के मारले जातील” असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5