Skip to content Skip to footer

इंटरनॅशनल डॉन देखील ज्यांना ओळखतात त्या गणेश नाईकांची चौकशी व्हावी – सुप्रिया सुळे

 

‘कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका, रात्री अपरात्री मला कधीही फोन करा, येथीलच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात, कोणालाही माझं नाव सांगा.’ असे वक्तव्य भाजपा नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या तुर्भे येथे एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

एसआयटीमार्फत इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी काल नवी मुंबई येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली, या दरम्यान त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे.” यासाठी अमित शाह यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणार असून संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5