पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले, चंद्रकांत पाटलांचा दावा

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे संपूर्ण राज्यभरात चर्चेत आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी विधान केले आहे.
“माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रपती केले होते” असा दावा पाटील यांनी केला आहे. ते भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. आता त्यांच्या या दाव्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

पाटील महाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुसलमानांना स्थान दिले असून, अब्दुल कलाम यांना देखील राष्ट्रपती त्यांनी केलंं आहे. त्यांना राष्ट्रपती मुस्लिम म्हणून केल नव्हते, तर एक कर्तृत्ववान, संशोधक म्हणून त्यांना केलं होतं,” असे पाटील यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here