Skip to content Skip to footer

इंधन दरवाढ मुद्द्यावरून ‘या’ अभिनेत्याचा अर्थमंत्री सीतारामन यांना टोला

देशभरात मागच्या काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने आधीच कंबरडं मोडलेल्या सर्व सामान्य नागरिक इंधन दरवाढीमुळे अधीकच त्रस्त झाले आहेत. त्यात सोशल मीडियावर सुद्धा इंधन दरवाढीचा मुद्दा प्रचंड गाजताना दिसत आहे.

ट्वीट, मिम्स, पोस्टर द्वारे लोक पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करत आहे. अलीकडेच ‘रंग दे बसंती’ या सिनेमातील अभिनेता सिद्धार्थ इंधन दरवाढीच्या मुद्यावर केंद्र सरकारवर ट्वीट करत टीका केली आहे. जेष्ठ वकील प्रश्नात भूषण यांनी आपल्या ट्विटर वरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत काँग्रेस सरकारच्या काळात वाढलेल्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून निर्मला सीतारामन यांनी तत्कालीन सरकारला (काँग्रेस) जबाबदार धरले होते.

त्यात आता भाजपाची सत्ता असताना सीतारामन यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीसाठी तेल कंपन्याना जबाबदार धरले आहे. प्रशांत भूषण यांच्या या व्हिडीओवर सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मामी, ज्यावर विश्वास ठेवते, त्यानुसार स्वत:ला बदलते. ना कांदा, ना स्मरणशक्ती, ना कुठला सिद्धांत… मामी रॉक्स,’ असे  ट्वीट सिद्धार्थने केले आहे.

https://twitter.com/Actor_Siddharth/status/1363722368598765569

Leave a comment

0.0/5