महाराष्ट्र बुलेटिन : श्री. संत शिरोमणी गुरू रोहिदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे संचालक व शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान मयुर चंद्रकांत कांबळे यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमा आदित्य ठाकरेंना भेट म्हणून दिली आणि चर्मकार समाजाला ज्या काही समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्यांसंदर्भात एक निवेदन देखील सादर केले.
अलीकडेच मयूर कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून चर्मकार समाजातील चप्पल विक्री आणि चप्पल दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे गटई कामगारांना दिवसाला केवळ दोनशे ते अडीचशे रुपये मिळतात. या तुटपुंज्या रकमेवर गटई कामगारांना आपल्या संसाराचा गाडा हाकावा लागत असतो. त्यामुळे ही मागणी मंजूर झाल्यामुळे गटई कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.