‘वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका’; पूजा राठोड कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात, मोठी घडामोड पाहायला मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन यांनी मुख्यमंत्री यांच्या मुंबई मधील ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला.

हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती. पूजा चव्हाणची आत्महत्या दुर्दैवी आहे. सरकार या प्रकरणात संवेदनशील आहे, पण दोषी आढळल्यास कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. रविवारी पुजाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले. हे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले. पुजाच्या कुटुंबीयांनी सरकार आणि तपास यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ”आम्ही आमची मुलगी गमावली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना शिक्षा द्यावी. या प्रकरणातील संशयावरून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु, केवळ संशयावरून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. राठोड हे आमच्या समाजातून खूप संघर्षातून इथपर्यंत आले आहेत असे त्यांनी बोलून दाखविले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here