मुंबई शहरात बत्तीगुल होण्यामागे चीनचा हात, ऊर्जा मंत्र्यांचा दावा

१२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई शहरात झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला होता. या बातमीमुळे महाराष्ट्रात नाही तर देशभरात एकच खळबळ उडाली होती. आता या दाव्याला काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दुजोरा देत न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या दाव्याला समर्थन दर्शवले आहे.

यावर पत्रकार परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, जेव्हा मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली, तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यावेळीही मी ३ सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत, त्यात तथ्य आहे असंच मला वाटत आहे.

तसेच सोमवारी संध्याकाळपर्यंत यावर सायबर सेल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितल्याचे ANI ने म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईतील बत्तीगुल होण्याचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here