काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल, काँग्रेसचे स्पष्टीकरण

मुंबई  : काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत अरविंद वाघमारे यांच्यावर भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार सुनीत वाघमारे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोप लावला आहे. सध्या सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सुनीत वाघमारे यांच्या अटकेची काँग्रेसने दखल घेतली आहे. सुनीत यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. याबाबतचे ट्विट काँग्रेचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे संदर्भात भाजप फार चिंतन करीत असल्याचे समजते. मात्र, सुनीत यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. २०१७ साली मुंबई मनपा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे सुनीत त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे‘ असे ट्विट त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here