Skip to content Skip to footer

अजित पवारांचा सल्ला, ‘जास्त अपेक्षा बाळगू नका, आर्थिकदृष्ट्या सरकारसमोर खूप मोठं आव्हान’

महाराष्ट्र बुलेटिन : आज अधिवेशनादरम्यान अजित पवारांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले की, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आघात झाला आहे. या कारणामुळे चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटींची तूट झाल्याचे समोर आले आहे.

ही माहिती देत असताना अजित पवारांनी जनतेला सल्ला दिला आहे की, जास्तीच्या अपेक्षा बाळगू नका, कारण आर्थिकदृष्ट्या सरकारसमोर खूप मोठं आव्हान आहे. चालू वर्षात आलेल्या प्रचंड तुटीमुळे पुढील आर्थिक वर्षात देखील त्याचे परिणाम आपल्याला पाहावयास मिळू शकतात.

तसेच त्यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकार कोणते उपाय योजणार आहे, याबाबत माहिती दिली जाईल. तसेच त्यांनी सांगितलं की, चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य सरकारने ३ लाख ४७ हजार कोटींचे महसुली उत्पन्न अपेक्षित धरलं होतं. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हे सर्व नियोजन कोलमडून पडलं. परिणामी जानेवारीअखेर केवळ १ लाख ८८ हजार कोटींचेच उत्पन्न जमा होऊ शकलं.

Leave a comment

0.0/5